सन्मान स्त्री शक्तीचा

सन्मान स्त्री शक्तीचा

मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर आयोजित केलेला स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा सोहळा, हेमंत रासने यांच्या पुढाकारातून दरवर्षी आयोजित होतो.

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री सन्मानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हेमंत भाऊ रासने यांनी याच परंपरेचा सन्मान राखत दरवर्षी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ सोहळ्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ परंपरेचा सन्मान करणे नसून, कसबा मतदारसंघातील सर्व माता-भगिनींचा गौरव करणे हे आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक आमंत्रित केले जाते आणि त्यांना भेटवस्तू दिली जाते, जी त्यांच्या अद्वितीय कर्तृत्वाचा सन्मान करते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित होत असून, या सोहळ्यामुळे महिलांना त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत झाला आहे.

हेमंत रासने यांचा विचार स्पष्ट आहे, “स्त्री शक्ती हा समाजाचा खरा कणा आहे. महिलांच्या योगदानामुळे समाजाची प्रगती होत आहे आणि त्यांचा सन्मान करणे हे केवळ एक कर्तव्य नसून ती आपली आदराची भावना आहे.” त्यांच्या या उपक्रमामुळे महिलांच्या कर्तृत्वाला नवी ओळख मिळाली आहे आणि समाजात त्यांचा गौरव केला जातो.

1 thought on “सन्मान स्त्री शक्तीचा”

  1. श्री दिनेश भिकुशेट जुन्नरकर

    भाऊ तुम्ही केलेल्या कामगीरी बदल खुप काही घेणं सारखं आहे त्यामुळे तुम्ही कसबा मतदार संघाचे विजयी आमदार हे आम्ही तुमच्या स्नेही आहोत आम्ही स्वता तुमच्या कामाची चिकाटी पाहीली आहे त्यामुळे आमची ऐक च आपेक्षा आहे तुम्ही आमदार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *