प्रिय बंधू - भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
स्वराज्याचे प्रेरणास्थान जिजाऊ माँ साहेब, हिंदवी स्वराज्य संस्थापक आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आपला कसबा. मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणारे श्रीमंत बाजीराव पेशवे, स्त्री शिक्षणाची कवाडे उघडणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ब्रिटिशांविरोधात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासह शेकडो महान विभूतींच्या वास्तव्याने आपली कसबा मतदारसंघाची भूमी पावन झाली आहे.
लालमहाल, शनिवारवाडा, थोर समाज सुधारक महात्मा फुले यांचा वाडा, लहूजी वस्ताद यांचे स्मारक, भिडेवाडा येथील मुलींची पहिली शाळा, विश्रामबागवाडा, नानावाडा या सारख्या वास्तूंचे आपल्या मतदारसंघात असणे हे आपले भाग्यच आहे.
मंडई परिसरात हारफुले विक्री करून मोठा झालेल्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला कसबा मतदारसंघातील नागरिकांनी विश्वास दाखवत आजवर अनेकदा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. गणेश मंडळाचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या पाठिंबामुळे पुणे महापालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द करता आली. स्थायी समिती अध्यक्ष असताना पुणे शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबवतानाच कसबा मतदारसंघासाठी देखील अनेक निर्णय घेता आले. १२ बलुतेदार आणि १८ पगड जातींचा असणाऱ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने दिली, परंतु पोटनिवडणुकीत यश मिळवण्यात थोडक्यात कमी पडलो. 'सेवा परमो धर्म' हे ब्रीद अंगीकारत नागरिकांनी दिलेला कौल स्वीकारत दुसऱ्या दिवसापासून मी व माझे सहकारी जनसेवेस लागलो.
कसबा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रस्त्यावर टेबल मांडत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून दररोज विविध प्रभागांमध्ये तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवण्यासाठी मी व सहकारी प्रामाणिकपणे काम करत आहोत. काही कामे तात्काळ मार्गी लावण्यात यश येतं, तर काही कामांसाठी विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करावा लागतो. आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासामुळे गेल्या 18 महिन्यांमध्ये जवळपास ६९२७ पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या समस्या सोडवू शकलो.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणारा शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग आता कार्यान्वित झाला आहे. या मेट्रो मार्गावर असणाऱ्या मंडई मेट्रो स्टेशन परिसरात व्यापाऱ्यांना विश्वासात घेत पुनर्वसन करण्यात करण्यात यश आलं, कसब्यातून धावणाऱ्या मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचा असणाऱ्या युडीसीपीआर नियमावलीत शासनाकडे पाठपुरावा करून शिथिलता आणण्यात आपण यशस्वी ठरलो, त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ऐतिहासिक वास्तूंचा 100 मीटर परिसरात असणाऱ्या बांधकामांच्या विकास करताना पुरातत्त्व विभागाच्या नियमावलीमुळे अडचण येत आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी एसआरए योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी देखील आपल्या माध्यमातून पाठपुरावा होत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवणे असो की नवीन रस्ते तयार करणे, परिसरातील साफसफाई, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, उद्यानांमध्ये सुविधा निर्माण करण्यासारखी शेकडो कामे राज्यातील महायुती सरकार आणि पुणे महापालिकेच्या मदतीने नजीकच्या काळामध्ये करण्यात आली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारचे मोफत दाखले, विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना व निराधार वृद्धांसाठी श्रावणबाळ निराधार योजनेअंतर्गत रुपये १५००/- पेंशन, अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून हजारो गोरगरीब नागरिकांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून अन्न-धान्याचा लाभ, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (आयुष्मान भारत) लाभ हजारो नागरिकांना मिळवून दिला.
शहरी गरीब योजना, पुणे महानगरपालिका (वैद्यकीय सहायता निधी) या योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना लाभ, मनपाच्या सामाजिक विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी पेंशन व विविध आवश्यक साहित्य घेण्यासाठी आर्थिक सहाय्य, छोट्या व्यवसायिकांना पंतप्रधान स्व-निधीचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे.
करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील मंदिर साकारत असताना एक रामसेवक म्हणून पुण्यनगरीत सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य मला मिळाले, या कार्यक्रमाला एक लाखाच्यावर राम भक्तांनी उपस्थिती लावली.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र हीच गोष्ट भविष्यात आपल्यासाठी अडचणीची ठरते हे लक्षात घेत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. मतदारसंघात विविध 15 ठिकाणी नागरिकांसाठी कॅन्सर सारख्या महागड्या तपासणीसह इतर वैद्यकीय तपासण्या मोफत करून देण्यासाठी जवळपास तीन वेळा दहा- दहा दिवसांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, यामध्ये हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामान्य कुटुंबातून आलेलो असल्याने शिक्षण घेण्यास किती अडचणी येतात हे मी जाणून असल्याने महानगरपालिकेच्या शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी माझी आग्रही भूमिका राहिली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव देण्यात आले. गोरगरीब नागरिकांना हॉस्पिटल मधील मोठे उपचार परवडत नाहीत, हे लक्षात घेत आपण मोफत करून देण्यात यशस्वी झालो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कानाचे उपचार व कानाचे मशीन आपण मोफत उपलब्ध करून दिले. पुणेकरांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या रिक्षाचालक बांधवांना बांधवाना आपण मोफत गणवेश वाटप केले.
राज्यातील माता भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने"चा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवत हजारो महिलांची नोंदणी करून घेण्यात आली, आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल याचा प्रयत्न केला.
स्त्री शक्तीचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे, गेली अनेक वर्षांपासून कसब्यातील माझ्या लाडक्या बहिणींसाठी दरवर्षी मकर संक्रांती निमित्त "सन्मान स्त्री शक्तीचा व हळदी कुंकू" कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आपण जपली आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माता भगिनींचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येतो. आपल्या भागातील हजारो माता-भगिनी या सोहळ्यात सहभागी होत असल्याचा आनंद माझ्या मनामध्ये कायम आहे.
दर्जेदार शिक्षण आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करतानाच युवकांसाठी आपण नोकरी महोत्सव देखील आयोजित करत आजवर हजारो तरुणांना नोकरी मिळवून दिली. आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने करत असतो. कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि विश्वासाच्या बळामुळे वरील सर्व कार्य पूर्ण करण्यात यशस्वी झाल्याचा आनंद आहे. आपले सहकार्य आणि पाठिंबा असाच मिळत राहील हा माझा ठाम विश्वास आहे.
आरोग्य शिबिरं: प्रत्येकासाठी मोफत आरोग्य तपासणी
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह
पुणे मेट्रो शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतचा परिवर्तनकारी प्रवास
भव्य रामरक्षा पठण सोहळा
सन्मान स्त्री शक्तीचा
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे नवे पर्व
युडीसीपीआर नियमांमध्ये बदल: पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा
कोरोना काळात ‘घरी जाऊ लस देऊ’ उपक्रम
पुणेकरांसाठी सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास: ‘दस मे बस’




























राजकीय जबाबदाऱ्या :
ट्रॅफिक च्या समस्येवर एक उपाय म्हणुन सार्वजानिक वाहतूक सक्षम करण्यासाठी केवळ १० रुपयांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात स्वस्त, आरामदायी आणि गतिमान प्रवासाची संधी देणारी ‘दस मे बस’ योजना, हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून.








To understand the long-term development roadmap and future plans for Kasba Peth, explore the Vision and upcoming initiatives.

