विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे नवे पर्व

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे नवे पर्व

शिक्षणाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हेमंत रासने यांनी केले.

हेमंत रासने यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी RTE अंतर्गत मोफत शालेय प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली, ज्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली.

याव्यतिरिक्त, त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागरिकांना भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या संकलित करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळून तब्बल ३०००० वह्या संकलित झाल्या. यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचे योगदान झाले आहे.

शिक्षणाच्या प्रचारासाठी हेमंत रासने यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन केले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्याचे तंत्र शिकवले आणि अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबद्दल माहिती दिली. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्त होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत